Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पगार न दिल्याने हॉटेल मालकाचा वेटरने केला खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे भागातील घटना

marathinews24.com

पुणे – पगार न दिल्याने वेटरने हाॅटेल मालकावर वेटरने भटारखान्यातील चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगाराला ताब्यात घेतले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संतोष शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या हाॅटेल मालकाचे नाव आहे. उमेश दिलीप गिरी (वय ३९) असे ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराचे नाव आहे.

सराईताला अटक, १७ मोबाईलसह दोन दुचाकी जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए रस्त्यावर शेट्टी यांचे पिकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट आहे. मंगळवारी रात्री भटारखान्यातील कामगार उमेश गिरी (वय ३९) याच्याशी त्यांचा वाद झाला. गिरी हा काही दिवसांपासून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. पगार, तसेच अन्य कारणांवरून त्याचा शेट्टी यांच्याशी वाद झाला होता. मंगळवारी राात्री त्यांच्यात पु्न्हा वाद झाला. वादातून गिरीने भटारखान्यातील चाकूने शेट्टी यांच्यावर वार केले. गंभीर जखमी शेट्टीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी गिरीला ताब्यात घेण्यात आले असून,त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×