Breking News
विद्यार्थिनींचा छळ म्हणजे संवेदनहिनतेचं भयंकर उदाहरण- डॉ. नीलम गोऱ्हेअण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्काराने विक्रम शिंदे सन्मानितधर्मवीर गडावर संभाजी महाराजांची सृष्टी उभारावीआई-मुलाच्या नात्यावर फुंकर घालणारे ‘पेरले’ गीत रसिकांच्या भेटीलाCrime News : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष पडले ४० लाखांनाPune – नवले पुलाजवळ अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशी ठारआई-बाबांवरील रागाने तिने गाव सोडले; पण पुणे पोलिसांमुळे आयुष्य वाचलेआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार-उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे शहरातील गुन्हेगारीत प्रचंड वाढयूपीएससी-२०२४ यशस्वितांचा सत्कार सोहळा १२ जुलैला

आम्हीच बाजीराव पेशव्यांचे वंशज, डीएनए तपासा – नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा

आम्हीच बाजीराव पेशव्यांचे वंशज, डीएनए तपासा

पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एन डी ए) येथे गुरुवारी बाजीराव पेशवे याच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे.या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिले तसेच व्यासपीठावर जागा देणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले असून, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असून, आपण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी केला आहे. आम्हीच बाजीराव पेशव्यांचे वंशज, डीएनए तपासा अस म्हणत पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महिला जनसुनावणीच्या माध्यमातून पिडीत महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर – सविस्तर बातमी 

बांदा म्हणाले, सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले गेले आहेत.त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांचा रक्त वंशज आहे. माझ्या पूर्वजांच्य बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे.माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी (1761 ) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठांच्या वतीने सहभाग घेतला. सत्ताविसव्या वर्षी त्यांचे निधन झाले.माझे पणजोबा नवाब अली बहादूर 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साथ देत, लढाई लढले. या सर्व गौरवशाली इतिहासाकडे थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीचे कुंदन कुमार साठे आणि सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजांना मानाचे स्थान देत, व्यासपीठावर स्थान दिले आहे. या कार्यक्रमांचे आमंत्रण देखील दोन दिवसांपूर्वी मला देण्यात आले असून, आपल्याला व्यासपीठावर बसवता येणार नाही, असे सांगितले आहे.

माझा याला विरोध नाही,पण या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा आणि अमित शहा यांना भरकटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाह हे इतिहासप्रेमी असून, त्यांनी यावर पुस्तक लिहिले आहे.त्यामुळे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी साहिबा प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक आहे. आम्ही अशा प्रकारचा आमचा अपमान सहन नाही करू शकत. याद्वारे आमच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करावा, ही आमची मागणी आहे.आम्हीच बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज असून, यासाठी आम्ही डी एन ए चाचणी करायला तयार आहोत. तसेच अशा अपमानामुळे आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top