Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा

लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका

marathinews24.com

पुणे – शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या ‘लोकमान्यनगर रहिवासी संघाने’ सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी नुकतेच एक पुनर्विकास धोरण जाहीर केले आहे, ज्यामुळे पुण्यातील प्रमुख आणि मध्यवर्ती वसाहतींपैकी एक असलेल्या लोकमान्य नगरचा कायापालट होणार आहे. त्यामुळे तुकड्यांमध्ये विकास न होता एकत्रित पुनर्विकास व्हावा, अशी मागणी लोकमान्यनगर रहिवासी संघाने केली आहे.

बारामती येथे ‘संविधान जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळा’ संपन्न – सविस्तर बातमी

रहिवासी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख, सुनील शहा, प्रशांत मोहोळकर, विवेक लोकूर यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते. एकत्रित पुनर्विकास झाल्यास सर्व सोयी सुविधांसह शहराच्या मध्यभागी वसलेल्या 16 एकरांचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील पुनर्विकासाचा आदर्श ठरणार आहे. लोकमान्य नगरच्या रहिवाश्यांनी गेली अनेक वर्षे ज्या गोष्टीसाठी ध्यास घेतला होता, त्यांच्या स्वप्नाची पूर्तता म्हाडाचे नवीन धोरण समर्थपणे करु शकेल. भविष्यातील पिढ्‌यांच्या गरजा लक्षात घेऊन हे सर्व नियोजन करणे गरजेचे आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील 100 वर्षे रहिवाशाना पायाभूत सुविधा किंवा जीवनशैलीतील सुधारणांची चिता करावी लागणार नाही, अशी भूमिका यावेळी नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली.

दरम्यान, एकल पुनर्विकास केल्यास मर्यादित सोयीसुविधा, छोट्या जागेमुळे कमी आकाराचे फ्लॅट्स, असमान व विस्कळीत बांधकाम, तसेच इन्फ्रास्ट्रक्चरवर अतिरिक्त ताण अशा अनेक समस्या निर्माण होणार आहेत. यामुळे एकात्मिक पुनर्विकास केल्यास संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. तसेच उद्यान, पार्किंग, सामुदायिक हॉल, सुरक्षा व्यवस्था यांसारख्या आधुनिक सोयी मिळतील. शिवाय रुंद रस्ते, पाणीपुरवठा, वीज व ड्रेनेजसारख्या सुविधा योग्य पद्धतीने उभारणे शक्य होणार असल्याचं सुनील शहा यावेळी म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×