आंबेगाव पोलिसांनी आरोपी पत्नीला केली अटक
marathinews24.com
पुणे – Crime News : पती चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे पत्नीने काढला पतीचा काटा, पत्नीने त्याला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना १ जुलैला दुपारी एकच्या सुमारास आंबेगाव खुर्दमशील साहिल हाईटसमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी महिला पत्नीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक परशुराम अजेंटराव (वय २३ रा. चिंधेनगर, जांभुळवाडी ) असे खून केलेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी दृषाली परशुराम अजेंटराव (वय २०) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमळकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
महिलेला सहा टक्केचा नफा पडला १८ लाखांना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि दृषाली यांचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही आंबेगाव खुर्दमशील साहिल हाईटसमध्ये राहत होते. दरम्यान, काही दिवसांपासून अभिषेक हा दृषालीच्या चारित्र्यावर संशय घेउन तिला मारहाण करीत होता. सततच्या मारहाणीला आणि जाचाला कंटाळून दृषालीने १ जुलैला पतीच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण केली. त्याला ठिकठिकाणी बेदम मारहाण करीत खून केला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासाअंती आरोपी दृषालीने पती अभिषेकला बेदम मारहाण करून खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
मुंढव्यात घरफोडी, सव्वा चार लाखांचा ऐवज चोरीला
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ४ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २८ जून ते २ जुलै कालावधीत मुंढव्यातील पिंगळे वस्तीवरील लक्ष्मी पार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह मुंढव्यातील पिंगळे वस्तीवरील लक्ष्मी पार्कमध्ये राहायला आहेत. २८ जून ते २ जुलै कालावधीत ते फ्लॅट बंद करून बाहेरगावी गेले होते. नेमके त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून १ लाख ९५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ४ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून आल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महानोर तपास करीत आहेत.
शेअर ट्रेडींगमधील जादा परताव्याचे आमिष महागात महिलेची १८ लाखांची फसवणूक
शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल १८ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ८ मे ते १३ जून कालावधीत खराडीत घडला आहे. याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियासह खराडीत राहायला असून, ८ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. महिलेचा विश्वास संपादित करून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याची बतावणी केली.
त्यामुळे सुरूवातीला काही रक्कम गुंतवणूक करताच महिलेला परतावा देण्यात आला. विश्वास बसल्यामुळे महिलेने गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या काही दिवसांत १८ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, त्यावर परतावा न मिळाल्यामुळे महिलेने संबंधिताला विचारणा केली. त्यानंतर त्याने संपर्क बंद करीत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तपास करीत आहेत.