Breking News
वादातून मित्राचा कालव्यात ढकलून केला खूनजेईई’चे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूकगुंगीचे इंजेक्शन टोचून तरुणीवर बलात्कारपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त; पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजनमाहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कारबारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्णअखेर नीलेश चव्हाणला पोलिसांच्या ताब्यातऑनलाईन टास्क पडले ४४ लाखांना, तरूणीला गंडाड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारीएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावा

डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरून हॉस्टेल चालकासह त्याच्या सुनेने तरुणाला बेदम मारहाण केली. महिलेने तरुणाच्या कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले आहेत.

पुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरला – सविस्तर बातमी

मिलिंद वसंत कोठारी (४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश विठ्ठल कांबळे (वय ६०) आणि सुनेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर असून, सोमवारी (दि. २६ ) दुपारी ते जेवण करुन घराबाहेर मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स होस्टेल चालवणारे सुरेश विठ्ठल कांबळे व त्यांची सुन आले. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून कोठारी यांच्याशी भांडायला लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली.

त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top