Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

दोन लहान मुले जखमी

marathinews24.com

पुणे – टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू – भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. अपघातात दोन लहान मुले जखमी झाली. रुक्मिणी राजू चव्हाण (वय २९, रा. वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव ) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात चव्हाण यांची दोन लहान मुले जखमी झाले. याबाबत राजू चव्हाण (वय ३३) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापारेषणच्या इन्फोसिस-पेगासस अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राजू, त्याची पत्नी रुक्मिणी आणि दोन मुले लोहगाव भागातून ४ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमराास निघाले होते. धानाेरी जकात नाक्याजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी रुक्मिणी आणि त्यांची दोन मुले जखमी झाली. रुक्मिणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी मुलांसह रुक्मिणी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रुक्मिणी यांचा मृत्यू झाला. मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस कर्मचारी वाय. एस. चव्हाण तपास करत आहेत

मोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे वय अंदाजे ६५ वर्ष असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ४ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट पूल परिसरातून ज्येष्ठ निघाला होता. त्यावेळी भरधाव मोटारीने ज्येष्ठाला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत.

मगरपट्टा रस्त्यावर दुचाकीस्वार तरुण ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मगरपट्टा रस्त्यावर घडली. मंगेश पांडुरंग चामनर (वय १७, रा. गवळी वाडा, साईनाथनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत दत्ता सुरनर (वय ३४, रा. वडगाव शेरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार मंगेश १ जुलै राेजी मगरपट्टा रस्त्याने सकाळी साडेसातच्या सुमारास निघाला होता. अमनोरा माॅलजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वार मंगेशला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. उपचारांपूर्वीच मंगेश याचा मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×