Breking News
Fraud Case Pune : शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करणारा जेरबंदHadapsar Crime News : हडपसर गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी गजाआडमुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते महाआवास अभियान अंतर्गत पुरस्कारांचे वितरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटनमुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’चा पारितोषिक वितरण संपन्नघरफोडी करणारे तीन अल्पवयीन ताब्यात, ४ गुन्हे उघडकीसलोकमान्यनगर, वाघोली परिसरात घरफोडीटोळक्याने दोघांना मारहाण करून लुटलेउरळी देवाची परिसरात महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावलेतडीपाराने काढला कोयता, भीतीने नागरिक सैरावैरा पळाले

“महिला आयोग आपल्या दारी” 15 ते 17 एप्रिल 2025 रोजी आयोजन

15 ते 17 एप्रिलदरम्यान ‘महिला आयोग आपल्या भेटीला’ विशेष उपक्रमाचे आयोजन

Marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी दि. १५ ते १७ एप्रिल, २०२५ या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तीन दिवस पुणे जिल्हा दौरा करणार आहेत. यावेळी पुणे शहरातील तक्रारींची सुनावणी मंगळवार, १५ एप्रिल रोजी, तर पुणे ग्रामीणसाठी जनसुनावणी बुधवार, १६ एप्रिल रोजी होणार आहे. या दोन्ही जनसुनावण्या नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. तर गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे येथे सकाळी ११ वाजता पिंपरी-चिंचवडकरिता जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसुनावणीला जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top