Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

 ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विश्रांतवाडी येथे केले होते कार्यक्रमाचे आयोजन 

marathinews24.com

पुणे – जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, पुणे विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, ज्येष्ठ नागरिक संघ व संस्थांचे प्रतिनिधी, कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी, गृहप्रमुख, गृहपाल, समाजकार्य महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार कौशल्यांचे प्रशिक्षण–मंत्री मंगलप्रभात लोढा – सविस्तर बातमी 

कोचुरे म्हणाल्या, प्रशासनाला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करायला मिळणे हे भाग्याचे आहे. आपल्यातील उत्साह, आनंद, सामाजिक कार्यातील ओढ या सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत असेही त्या म्हणाल्या. तसेच लोंढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी समाजकल्याण विभाग सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

समाजकल्याण विभागाच्यावतीने ज्येष्ठांसाठी विशेष कार्य करणाऱ्या दिलीप पवार, चंद्रकांत महामुनी, दशरथ भालेराव, शामकाका पेशवे, चंदा मानकर, चारुता कडुरकर व वैजयंती जगताप आदींचा व इंटरनॅशनल लॉज्युटी सेंटर, पुणे, हेल्पेज इंडिया संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे आणि जिल्हा शल्य चिकित्सालय, औंध येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×