बिबवेवाडीत तरुणावर कोयत्याने हल्ला, वैमनस्यातून झाली घटना
marathinews24.com
पुणे – वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओंकार शाहूराज जाधव (वय २५, रा. प्रतिभा निवास, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. आदित्य कांबळे (रा. वैभव सोसायटी, कॅनरा बँकेजवळ, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेले साथीदार देवेन पवार (रा. गॅस गोदामाजवळ, बिबवेवाडी), मेहुल धोखा (रा. गोकुळनगर, कात्रज) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाधवने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हात बॉम्बची विक्री प्रकरण आरोपीला कारावासाची शिक्षा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार जाधव हा गुरुवारी रात्री त्याचा मित्र विजय चौहानच्या दुचाकीवरुन चालला होता. जाधव आणि पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यावेळेस जाधवने पवारला शिवीगाळ केल्याने तो चिडळा होता. बिबवेवाडीतील महेश सोसायटीसमोर आरोपी पवार आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी जाधव याच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या जाधवला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा आरोपी पवार आणि साथीदार धोखा हे खासगी रुग्णलायात गेले. पोलिसांकडे तक्रार करु नकोस, उपचाराचा खर्च आम्ही करतो, अशी धमकी त्याला दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करत आहे.