पोलीस व्हॅनच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

आरोपींना घेऊन जाणाऱ्या गाडीने दिली होती धडक

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – बँक घोटाळ्यातील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत तरुण ठार झाला आहे. अहमदपूर ते अहिल्यानगर राज्य महामार्गावर येळंबघाट जवळ शनिवारी ( दि.१७) सायंकाळी भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमोल हांडगे (वय ३५) असे ठार झालेल्याचे नाव आहे. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी

निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाघेबाभळगाव (ता. केज) येथील रहिवासी असलेले अमोल हांडगे आणि विक्रम हांडगे (वय३५) हे दोघे शेतकरी कामानिमित्त नेकनूर येथे आले होते. काम आटपून सायंकाळच्या सुमारास ते दुचाकीवरून आपल्या गावाकडे परत जात होते. याच दरम्यान, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना केज येथून बीडकडे घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन भरधाव वेगाने येत होती. नेकनूर-येळंब रस्त्यावर या पोलीस व्हॅनने अमोल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे अमोलचा एक पाय जागीच तुटला. शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमोल आणि विक्रम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अपघातातील अमोल हांडगे याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×