मुंढव्यात घरफोडीचा घटना, चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला
Marathinews24.com
पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ११ एप्रिलला पहाटे चारच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगर परिसरात असलेल्या इमारतीत घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग करून रिक्षाचालक पसार, पोलिसांकडून शोध सुरू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कुटूंबियासह मुंढव्यातील संभाजी चौकातील इमारतीत राहायला आहे. ११ एप्रिलला पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील कपाटातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुसर्या दिवशी तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी तपास करीत आहेत.