प्रवासी महिलांचे दागिने चोरणारा गजाआड

येरवडा पोलिसांनी आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – पीएमपीपीएल प्रवासी महिलांकडील दागिने चाेरणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून एक लाख २५ हजारांची सोनसाखळी जप्त करण्यात आली. सुशांत शंकर गायकवाड (वय २४, रा. साईनाथनगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

गोळीबारात सराइताचा साथीदार जखमी हडपसरमधील घटनेने खळबळ – सविस्तर बातमी

पीएमपी बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी दिल्या होत्या. पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील चोरलेली सोनसाखळी विक्री करण्यासाठी गायकवाड येरवडा बाजारातील सराफी पेढीत येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विजय अडकमोल आणि नटराज सुतार यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून गायकवाडला पकडले. त्याच्याकडून सोनसाखळी जप्त करण्यात आली.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रतीकांत नंदनवार, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, सचिन गवळी, महेंद्र शिंदे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top