Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

हडपसरमधील घटना; पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मंदिरातील दानपेटी फोडून राेकड लांबविणारा अटकेत – सविस्तर बातमी

प्रतिक्षा अभिषेक खळदकर (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती अभिषेक आनंद खळदकर, सासरे आनंद, सासू सविता, दीर चेतन, नणंद वैभवी (सर्व रा. धनकवडी), निर्मला आवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रतिक्षाची आई उषा राजेंद्र हरपळे (वय ४०, रा. हरपळे आळी, फुरसुंगी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षाचा ११ जून २०२० रोजी अभिषेक खळदकर याच्याशी विवाह झाला होता. हुंड्यात प्रतिक्षाला सात तोळे सोन्याचे दागिने, तसेच विवाहाचा खर्च हरपळे कुटुंबीयांनी केला होता. सासरी नांदत असताना प्रतिक्षाला वेळोवेळी टोमणे मारुन तिचा छळ करण्यात आला. छळामुळे ती माहेरी निघून आली. ६ एप्रिल रोजी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रतिक्षाचा छळ केल्याने तिने आत्महत्या केली, अशी फिर्याद तिची आई उषा हरपळे यांनी नुकतीच दिली. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×