Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

कात्रज भागातील गावठी दारू अड्ड्यावर जेसीबी चालवला

महापालिका आणि पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – बेकायदा बांधलेल्या घरातील गावठी दारू अड्ड्यावर आंबेगाव पोलिसांनी कारवाई केली. महापालिकेच्या मदतीने बेकायदा दारू अड्ड्यावर जेसीबी चालविण्यात आला. बेकायदा बांधलेले घर आणि पत्र्याचे शेड पाडून टाकण्यात आले. कात्रज भागातील साईनगर परिसरात कारवाई करण्यात आली.

कोथरूड मधील बंगल्यात चंदन चोरी – सविस्तर बातमी

कात्रज भागातील सच्चाई माता मंदिर परिसरापासून काही अंतरावर साईनगर आहे. या भागातील काही महिला बेकायदा दारू अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बेकायदा तेथे घर आणि पत्र्याचे शेड बांधण्यात आले होते. यापूर्वी पोलिसांनी तेथे कारवाई केली होती. हे बांधकाम बेकायदा होते. याबाबतची माहिती महापालिकेला कळविण्यात आली.

त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदा घर, तसेच शेड जेसीबीचा वापर करुन पाडले. पोलिसांनी तेथून दारुचे प्लास्टिक कॅन जप्त केले, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×