Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

वाघोलीतील ४५ वर्षीय व्यक्तीची सायबर फसवणूक

marathinews24.com

पुणे – खासगी आयुर्विमा पाॅलिसीची रक्कम परत मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीएमपीएल बसमधून पडली, शालेय बसखाली सापडून महाविद्यालयीन तरूणी ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय तक्रारदार हे वाघोलीत राहायला आहेत. त्यांनी एका खासगी कंपनीच्या आयुर्विमा पाॅलिसीत रक्कम गुंतविली होती. सायबर चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधला. आयुर्विमा पाॅलिसीची मुदत संपली असून, विमा कंपनीकडून तुम्हाला रक्कम परत करण्यात येणार आहे, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्याने नाहरकत प्रमाणपत्र, अन्य करांच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. चोरट्याच्या बँक खात्यात त्यांनी ४० लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना पाॅलिसीत गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी चौकशी केली. चौकशीत फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करत आहेत.

पाॅलिसी सुरू करून देण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

बंद पडलेली विमा पाॅलिसी सुरू करून देण्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने हडपरसमधील एका तरुणाची अकरा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.

सायबर चोरट्याने तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. बंद पडलेली विमा पाॅलिसी सुरू देतो. पाॅलिसी सुरू झाल्यानंतर २५ लाख ९२ हजार रुपये परत मिळवून देतो, असे आमिष दाखवून तक्रारदाराला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्याने तक्रारदार तरुणाने चोरट्याच्या बँक खात्यात वेळोवेळी दहा लाख ८६ हजार रुपये जमा केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×