Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे ची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार

marathinews24.com

पुणे – ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे ची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री कृष्ण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कृषी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात संपन्न झाली. प्रसंगी सोसायटीच्या ११० वर्षांचा इतिहास थोडक्यात मांडणारी चित्रफित दाखवून वर्षभरात देवाज्ञा झालेल्या सभासदांना, भारतीय जवानांना, शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सार्वजनिक उपक्रम समितीची मिसिंगलिंक प्रकल्पास भेट – सविस्तर बातमी

या वार्षिक सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विभागीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉ. सुभाष भालेकर उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक भाषण सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत यांनी करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

वार्षिक सभेचे अवचित्य साधून दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून प्रमाणपत्र व भेट वस्तू देण्यात आले. सेवानिवृत्त संचालक आणि सभासदांचा सत्कार, तसेच विशेष प्राविण्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सोसायटीच्या सचिव सौ. सुवर्णा टिळेकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचन करून काय ठराव सभासदांपुढे प्रस्तुत केले. सभासदांच्या शंकांचे समाधान अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत, उपाध्यक्ष पद्मनाथ गरसुळे, सचिव सौ. सुवर्णा टिळेकर यांच्यासह उपस्थित संचालक मंडळांनी केले. संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन गणेश मोढवे यांनी केले होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×