Breking News
तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात धावत्या कारमध्ये वकिल महिलेवर अत्याचारऑनलाईन औषध विक्रीविरोधात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद तडीपार गुंड टोळीची लोणी काळभोरमध्ये पुन्हा दहशतपुणे विमानतळावरून पळण्याच्या डाव फसलागटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉलरिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला; जुन्या वादातून मारहाणपुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनांनी खळबळविशेष वृत्त – साथी पोर्टल: बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊलदुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूकीसाठी १७ रस्ते वाहतूकीस बंद

६ ते ७ सप्टेंबर कालावधीत वाहतूक बदल, पर्यायी मार्गांचा अवलंब करा

marathinews24.com

पुणे – शहरातील गणशोत्सवाची धामधूम मोठ्या उत्साहात पार पडली असून, बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकीसाठी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलीस सज्ज झाले आहेत. ६ ते ७ सप्टेंबर कालावधीत दोन दिवस विसर्जन मिरवणूक मार्गात वाहतूक बदल करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.

शासकीय आश्रमशाळा, वस्तीगृहात विद्यार्थ्यांनींची गर्भतपासणी केली जात नाही – सविस्तर बातमी

गणपती विसर्जन सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) सकाळी सात वाजल्यापासून वाहतूकीत बदल केला आहे. त्यानुसार लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यासह प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. संबंधित रस्त्यावर ६ सप्टेंबर सकाळी सात वाजल्यापासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. विसर्जन सोहळ्यासाठी वाहतूक शाखेतील अधिकार्‍यांसह १ हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्यासाठी; तसेच रुग्णवाहिकेसाठी मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, वाहने पार्किंगसाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून दिली आहे.

पुण्यात ६ ते ७ सप्टेंबरला वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते

शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक), ना. गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (खंडुजीबाबा चौक ते फग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक), पुणे-सातारा रस्ता (व्होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (ढोले पाटील चौक- सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलिस ठाणे; तसेच शेलारमामा चौक), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक).

शहराबाहेर वर्तुळाकार मार्ग

विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहन चालकांसाठी पर्यायी वर्तुळाकार मार्ग तयार केला आहे. चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, सिमला ऑफिस चौक, संचेती हॉस्पिटल, अभियांत्रिकी महाविद्यालय, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरू रस्ता, संत कबीर पोलिस चौकी, सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, मार्केट यार्ड, शिवनेरी रस्ता, सातारा रस्ता, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक. दरम्यान, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संबंधित रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू राहणार आहे.

१३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी), एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी), स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), पेशवे उद्यान, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ, (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी), संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय मैदान (दुचाकी आणि चारचाकी), जैन हॉस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी), नदीपात्र ते भिडे पूल (दुचाकी आणि चारचाकी)

१० ठिकाणी नो पार्किंग

लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता नो पार्विंâग आहे. त्यासोबतच खंडोजीबाबा चौक ते वैशाली हॉटेलपर्यत उपरस्त्यांना जोडणार्‍या दोन्ही बाजूंना १०० मीटर परिसरात पार्किंगला बंदी केली आहे.

४८ तास जड वाहतूकीला बंदी

गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शहरात अवजड वाहनांना तब्बल ४८ तास बंदी घालण्यात आली आहे. ६ सप्टेंबर मध्यरात्री १२ ते ७ सप्टेंबर रात्री १२ वार्जपर्यंत जड वाहन चालकांनी मध्यवर्ती भागात वाहने आणू नयेत. वाहतूक करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

पुणेकरांसह भाविकांनी गणेशोत्सव कालावधीत अतिशय शिस्तबद्धचे दर्शन घडविले आहे. विसर्जन मिरवणूकीतही भाविकांकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. विसर्जन मिरवूणकीच्या अनुषंगाने महत्वाचे १७ रस्ते वाहतूकीस बंद केले असून, विविध भागात वाहतूक वळविली आहे. वाहन चालकांसह भाविकांनी रिंगरोडचा वापर करावा. वाहतूक पोलिसांना सहकार्य करून विसर्जन मिरवणूक शांंततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. -अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×