June 11, 2025

रिंगरोडसाठी ३९ हेक्‍टर गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण
पिंपरी चिंचवड

रिंगरोडसाठी ३९ हेक्‍टर गटांच्‍या क्षेत्राची मोजणी पूर्ण

भूसंपादनाच्‍या कामाला मिळणार गती marathinews24.com पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या (पीएमआरडीए) वतीने होणाऱ्या रिंगरोडच्‍या भूसंपादन कामाला गती मिळणार […]

डंपरच्‍या धडकेत एकाचा मृत्यू
गुन्हेगारी

डंपरच्‍या धडकेत एकाचा मृत्यू

अपघातात युवकाचा मृत्यू marathinews24.com पिंपरी – भरधाव वेगातील डंपरने दुचाकीस्वारास मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्‍वाराचा मृत्यू झाला. ही घटना

टेम्पो चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण
गुन्हेगारी

टेम्पो चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण

इंडोरन्स चौक महाळुंगे येथील घटना  marathinews24.com पिंपरी – समोरची गाडी बंद पडल्याने टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो थांबवला. त्यावेळी टेम्पोच्या

नीटच्या उत्तरपत्रिकेत घोटाळा?
ताज्या घडामोडी

नीटच्या उत्तरपत्रिकेत घोटाळा?

खादार सुप्रिया सुळे यांची ट्विटद्वारे चौकशीची मागणी marathinews24.com पिंपरी – नीट २०२५ झालेल्या परिक्षेत देहूरोड येथील एका विद्यार्थीनीच्या ओएमआर शीटमध्ये

'फूटबोर्ड'वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
पिंपरी चिंचवड

‘फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई

पुणे-लोणावळा लोकलसेवेसाठी आदेश marathinews24.com पिंपरी – मुंबई उपनगर रेल्वेतील मुंब्रा-दिवा स्थानकावर सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर असुरक्षितरित्या रेल्वे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा

कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे उद्घाटन
पुणे

कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे उद्घाटन

यशाचा मार्ग शोधण्यासाठी दूरदृष्टी असणे महत्त्वाचे – शास्त्रज्ञ भारतभूषण जोशी  marathinews24.com पुणे – यशाचा मार्ग शोधण्यासाठी दूरदृष्टी असणे महत्त्वाचे आहे. अशी

शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण
गुन्हेगारी

शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना १४ जून पर्यंत पोलीस कोठडी

बेकायदेशीर शस्त्र परवाना प्रकरण marathinews24.com पुणे – खोट्या माहितीच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्याप्रकरणी दिवंगत वैष्णवी हगवणे हिचा पती शशांक हगवणे

गुन्हेगारी

स्पोर्टस बाईकवरून सोनसाखळी हिसकावणार्‍या सराईताला बेड्या

८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस, रांजणगावसह एलसीबी पथकाची कामगिरी marathinews24.com पुणे – पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र

स्पोर्टस बाईकवरून सोनसाखळी हिसकावणार्‍या सराईताला बेड्या ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस, रांजणगावसह एलसीबी पथकाची कामगिरी पुणे- पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून नेणार्‍या अट्टल चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या रांजणगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, तब्बल १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८ रा लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार शरद बापु पवार (रा लोणी सय्यदमीर ता आष्टी) पसार आहे. याप्रकरणी वंदना रोहिदास शेटे (वय ३३ रा. पिंपरी दुमाला ता शिरुर पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वंदना शेटे २५ मार्चला रांजणगाव गणपती चौकातील धनगरवाडा स्नॅक्स सेंटरमध्ये होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी पाण्याची बाटली खरेदीच्या बहाण्याने वंदनाला ५० रूपये दिले. त्यानंतर उर्वरित पैसे देत असताना आरोपींनी महिलेच्या गळ्यातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस करीत होते. घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करताना स्पोर्टबाईक वापरली होती. दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर, चाकण, आळंदीसह अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने गुन्हे झाले होते. परिसरातील मार्गावर १० दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीसांनी संयुक्तरीत्या सापळे रचले. परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासले. संबंधित गुन्हा मारुती ऊर्फ गोविंद आंधळे आणि शरद बापु पवार यांनी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आंधळे हा अहिल्यानगर ते शिरूरला स्पोर्टस बाईकवरुन येणार असल्याची माहिती अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शिरुर हददीत सतरा कमान पुलाच्या अलीकडे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय कुलदिप संकपाळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ, थोरात, दत्ता शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, संतोष सांळुखे, खरबस, साळवे यांनी केली. *८ गुन्हे उघडकीस, १० तोळे सोने जप्त* स्पोर्टस बाईकवरून प्रवास करीत आरोपींनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी देवाची, अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत परिसरात गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी, ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हेगारी

पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशावरुन खुनाची उकल

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे – पावसामध्ये चमकलेल्या वीजेच्या प्रकाशातून भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या खुनाची उकल केली आहे. याप्रकरणी

error: Content is protected !!
Scroll to Top