Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

शिक्षणासाठी धावले ३ हजार ८०० पुणेकर

शिक्षणासाठी धावले ३ हजार ८०० पुणेकर

एकल धावमहोत्सवाचे तिसरे पर्व उत्साहात पार पडले

marathinews24.com

पुणे – शिक्षण आणि समाजकार्याच्या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेला एकल धावमहोत्सव – पुणे (तिसरे पर्व) रविवारी, ४ जानेवारी २०२६ पहाटे महाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. या धावमहोत्सवाचे आयोजन फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी, पुणे विभाग यांच्यावतीने करण्यात आले होते.

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

धाव महोत्सवात सुमारे ३ हजार ८०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. दुर्गम ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी निधी संकलन हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विशेष बाब म्हणजे, एकल फाउंडेशन अंतर्गत शिक्षण घेणारी तब्बल ३०० आदिवासी मुले स्वतः धावली, ज्यामुळे उपस्थित धावपटूंना व नागरिकांना मोठी प्रेरणा मिळाली.

धाव महोत्सवात २१ किमी, १० किमी आणि ५ किमी स्पर्धात्मक धाव, तसेच ३ किमी आनंदी धाव घेण्यात आली. यामध्ये कार्पोरेट धाव करण्यात आली आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या कंपनीला सन्मानित करण्यात आले. स्पर्धात्मक धावांसाठी अत्याधुनिक वेळ मोजणी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली होती. प्रत्येक गटातील विजेत्या धावपटूंना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेली ‘फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी’ (एकल फाउंडेशन) ही संस्था गेली ३७ वर्षे समाजसेवेचे भरीव कार्य करत आहे.

देशभरातील ३७ शाखांद्वारे सुमारे ४५ हजार एकल विद्यालयांच्या माध्यमातून तब्बल १२ लाख आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण, संस्कार आणि जीवनमूल्ये पोहोचवण्याचे कार्य संस्था करत आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धाव महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी धावपटू, स्वयंसेवक, आयोजक व पुणेकरांनी समाधान व्यक्त केले असून, “धावण्यातून शिक्षणासाठी योगदान” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×