जर्मनीत हॉटेल व्यवसायाच्या बहाण्याने ५४ लाखांचा गंडा

जर्मनीत हॉटेल व्यवसायाच्या बहाण्याने ५४ लाखांचा गंडा

पाच जणांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जर्मनीत हॉटेल व्यावसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ५४ लाखांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सप्टेंबर २०२४ ते २० मे २०२५ कालावधीत घडली. किरण कुमार त्रिवेदी (रा. कांताकुंज, गुजरात), चंद्रेश त्रिवेदी, जानव्ही चंद्रेश त्रिवेदी (दोघेही रा. साल्सबर्गर स्ट्रिट, जर्मनी), निती पांडेय, तृप्ती नितीन पांडेय (२८, दोघेही रा. वल्लभनगर, इंदोर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हरदीपसिंग अमोलकसिंग होरा (वय ५४, रा. सायकल मर्चंट हौंसिंग सोसायटी, रास्तापेठ) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार दरम्यान घडला.

रामटेकडी इंडस्ट्रीयल भागातील कंपनीत वायर बंडल चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीत किल शहरात दोन रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार आहेत. त्या रेस्टॉरंट बारमधुन कोट्यवधींचा नफा होतो अशी बतावणी करीत आरोपींनी नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची बतावणी तक्रारदारांना केली. व्यवसायात २५ टक्के शेअर करता ५४ लाख गुंतवणुक केल्यास ते तक्रारदाराच्या मुलाला २ लाख रूपये प्रतिमहीना पगाराने हॉटेलमध्ये नोकरी देणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांचा भाचा कुणालाला देखील व्यवसायात भागीदार बनवण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपींनी होरा यांच्याकडून वेळोवेळी बँक ट्रान्सफर तसेच रोख स्वरूपात पैसे घेतले. त्यानंतर कोणताही हॉटेल व्यवसाय सुरू न करता होरा यांची ५४ लाखांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास समर्थ पोलिस करत आहेत.

पीएमपीएल बसप्रवासात १५ हजारांची रोकड चोरीला

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगची चेन उघडून १५ हजारांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रे चोरून नेली आहेत. ही घटना २६ ऑगस्टला दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास लालमहल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी पिंपरीगावात राहणार्‍या ४७ वर्षीय नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे २६ ऑगस्टला दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास लालमहल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन प्रवास करत होत. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तक्रारदाराच्या पिशवीची चैन उघडून १५ हजारांची रोकड आणि कागदपत्रे चोरून नेली. काही वेळानंतर तक्रारदाराला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×