आंदेकर टोळीकडून कुटूंबियाचा होणार होता गेम
marathinews24.com
पुणे – पोलिसांमुळे गुंड सोमनाथ गायकवाड याच्या कुटूंबियाचा जीव वाचला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची टोळीने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत घडली होती. मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड याने टोळीच्या मदतीने आंदेकरची हत्या घडवून आणली होती. त्याच रागातून आंदेकर टोळीमध्ये सूडाची भावना होती. वर्षभरात बदला घेउ, अशी शपथ टोळीने घेतली होती. गायकवाड कुटूंबिय आंबेगाव पठार परिसरात राहायला असल्याने आंदेकर टोळीने भाडोत्री खोली घेउन तिथे रेकी केली. गायकवाडची पत्नी आणि मुलाची माहिती गोळा करत बदला घेण्याचा डाव टोळीने रचला. मात्र, भारती विद्यापीठ पोलिसांसह गुन्हे शाखेने आरोपी कृष्णा काळेला अटक केली.
कुख्यात बंडू आंदेकरसह टोळीला अटक, पुणे गुन्हे शाखेची कारवाई – सविस्तर बातमी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गायकवाड कुटूंबियावरील हल्ल्याचा डाव उधळून लावत कृष्णा काळे याला अटक केली होती. तेव्हापासून आंदेकर टोळी इर्शेला पेटली होती. वनराजच्या हत्येला वर्षपुर्ती होउनही खूनाचा बदला पुर्ण झाला नव्हता. त्यामुळे टोळीने थेट घरातील नातवाला निवडले. त्याची दोन दिवस रेकी करीत टारगेट केले. अखेर ५ सप्टेंबरला रात्री पावणे आठच्या सुमारास गोळ्यांचा वर्षाव करीत आयुषचा खून केल. दरम्यान, आरोपी घरातील नातवालाच टारगेट करतील याची साधी भनकही पोलिसांना लागून दिली नाही. मात्र, गणेशोत्सव विसर्जन सोहळा बंदोबस्तासह इतर तणाव असतानाही पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे कौतुक केले जात आहे.
बंडू आंदेकरला गुडघ्यावर बसायला लावले
कुख्यात बंडू आंदेकर हा कुटूंबियासमवेत मोटारीतून प्रवास करत आहे. तो बुलढाण्याजवळ असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट एकचे पोलीस अमलदार शुभम देसाई यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने एक पथक बुलढाण्याच्या दिशेने रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी कुख्यात बंडू आंदेकरसह इतरांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना प्रसार माध्यमासमोर आणल्यानंतर कुख्यात बंडू आंदेकर मांडी घालून बसला होता. त्यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी त्याला दरडावरून ये गुडघ्यावर बस असे बजावले. त्यानंतर तो गुडघ्यावर बसला.
दोघा हल्लेखोरांची खबरही अमलदार शुभम देसाई यांचीच
आयुष्य कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून झाल्याची घटना घडली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तातडीने कामाला लागले. त्याचवेळी पथकामधील पोलीस अमलदार शुभम देसाई यांना दोन्ही हल्लेखोरांची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेउन अटक केली. मुख्य मारेकर्यांसह बंडू आंदेकर पसार होत असलेल्या दोन्ही बातम्या देसाई यांनीच मिळविल्या. त्यांच्या नेटवर्कमुळे गुन्हे शाखेने तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.























