Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरले

तुळशीबागेत महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

अलका टॉकीज, लक्ष्मी रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या महिलांवर दागिने गमविण्याची वेळ आली आहे. गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील २ लाख २५ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. या घटना ६ ते ७ सप्टेंबरला मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता आणि अलका टॉकीज चौकात घडल्या आहेत. त्यानुसार याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेट्रो प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन, ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पहिल्या घटनेत तक्रारदार महिला बावधनमध्ये राहायला असून, ६ सप्टेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख २५ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. काही वेळानंतर महिलेला गळ्यात चैन नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार पडघमकर तपास करीत आहेत.

गणेश विजर्सन सोहळ्यात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील १ लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना ७ सप्टेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास अलका टॉकीज चौकात घडली आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्‍या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×