Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

चांदणी चौक-जांभुळवाडी व बकोरी रस्त्यांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश-उपमुख्यमंत्री अजित पवार

वाघोली ते केसनंद, वाघोली ते आव्हळवाडी रस्त्याचे काम करण्याचेही निर्देश

marathinews24.com

मुंबई – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुण्यातील चांदणी चौक ते जांभुळवाडी आणि जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या दोन्ही रस्त्यांच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगरपालिकेने या दोन्ही रस्त्यांच्या भूसंपादनासाठी जमीनधारकांसोबत तातडीने बैठक घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाचा घेतला आढावा – सविस्तर बातमी

चांदणी चौक ते जांभूळवाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी रस्ता, वाघोली ते केसनंद, वाघोली ते आव्हळवाडी या रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या नागरीकरणामुळे पुणे शहरातील वाहतुकीवर ताण येत असून त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

वाघोली ते केसनंद,वाघोली ते आव्हळवाडी रस्त्याचे काम करावे

वाघोली ते केसनंद आणि वाघोली ते आव्हळवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता असला तरी, नागरिकांची होणारी गैरसोय पाहता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा रस्ता तातडीने तयार करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणेचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव विकास ढाकणे हे मंत्रालयातून तर आमदार माऊली कटके, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×