Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सोरतापवाडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सोरतापवाडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

स्वच्छता, ग्रामविकास व जन जागृतीबाबत घोषणाबाजी करीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीत आज उत्साहात संपन्न झाला. या अभियानाचे उद्घाटन पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. स्वच्छता, ग्रामविकास व जन जागृतीबाबत घोषणाबाजी करीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभियानाचा संदेश जन मानसात पोहोचविण्यासाठी आकर्षक चित्ररथाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्याचे जीवन सुलभ करण्यावर शासनाचा भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

अभियानाचे उद्दिष्ट कालावधीत ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षक जालिंदर काकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे, उपक्रम व ग्रामीण विकासासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सहभागी करून विकास कामांना गती द्यावी व सामूहिक प्रयत्नांमुळे पुणे जिल्हा राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्रबिंदू मानून कार्य करण्याचे आवाहन केले. या अभियानातून आदर्श व शाश्वत ग्रामविकासाची दिशा निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास अप्पर आयुक्त (विकास) दीपाली देशपांडे, सहाय्यक आयुक्त (विकास) रविंद्र कणसे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) भुषण जोशी, हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, सरपंच मनीषा चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कड यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच विलास चौधरी यांनी केले. आभार रामदास चौधरी यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×