२१ कोटी ६५ लाख खंडणी प्रकरण
marathinews24.com
पुणे – Crime News : गणेश पेठेतील मच्छी मार्वेâटमधील मासे विक्रेत्यांना धमकावून कुख्यात बंडू आंदेकर टोळीने तब्बल २१ कोटी ६५ लाखांची वसुली केली आहे. याप्रकरणी चौघा वसुलीदारांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते आंदेकर टोळीसाठी व्यावसायिकांकडून वसुली करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आंदेकर कुटूंबियाकडे मोठ्या प्रमाणात पैसे असण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आयकर विभागाला पत्रव्यवहार करीत चौकशीची विनंती केली आहे.
पत्रकार हल्ल्याचा निषेध – आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन उभे करू – सविस्तर बातमी
शेखर दत्तात्रय अंकुश, मनीश वर्धेकर, सागर बाळकृष्ण थोपटे, रोहित सुधाकर बहादुकर अशी अटक केलेल्या वसुलीदारांची नावे आहेत.
गृहकलहातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या १ सप्टेंबर २०२४ मध्ये झाली होती. त्याचा बदला म्हणून कुख्यात बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवावर हल्ला घडवून खून केला आहे. याप्रकरणताील बहुतांश आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान टोळीचा आर्थिंक कणा मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी गती दिली आहे. त्यानुसार केलेल्या तपासात आंदेकर टोळीने मागील १२ वर्षांपासून गणेश पेठ मच्छी मार्वेâटमध्ये प्रोटेक्शनच्या नावााखाली १५ ते ५० हजारांपर्यंत खंडणी उकळली. जवळपास २१ कोटी ६५ लाख रूपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यातील चौघा वसुलीदारांना अटक केली आहे.
आंदेकर कुटूंबियाकडे नियमबाह्य कोट्यावधींची संपत्ती असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, त्यांच्याकडे आर्थिंक उत्पन्नाचे मोठे साधन नाही. असे असतनाही संबंधितांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती मिळविली कशी, याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी आयकर विभागाला पत्र पाठविले आहे. त्यानुसार आंदेकर कुटूंबियाची मालमत्तेची चौकशी लवकर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच आंदेकर कुटूंबियांनी परदेशातही मालमत्ता विकत घेतल्याचे बोलले जात आहे. त्याअनुषंगाने चौकशी केली जाणार आहे.
गुंड सोमनाथ गायकवाडसह इतरांच्या मालमत्तेची चौकशी होणार
टोळीयुद्धावर अंकुश निर्माण करण्यासाठी पोलिसांनी टोळीचा आर्थिंक कणा मोडण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक वनराज आंदेकर टोळीतील आरोपी सोम्या गायकवाड याच्यासह इतर आरोपींच्या मालमत्तेची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही गुन्हेगारी टोळ्यांना डोईजड होउ देणार नसल्याचा इशारा पोलिसांनी मालमत्तेच्या चौकशीतून दिला आहे.
सराईत गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कठोर कारवाईसाठी पोलिसांनी वेळोवेळी प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने आंदेकर टोळीसह इतर टोळीचीही माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, व्यावसायिकांकडून खंडणी वसुल करणार्या चौघांना अटक केली आहे. – रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर






















