Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

एसटीच्या मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सध्या १० लाख वापरकर्ते

marathinews24.com

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाने मोबाईल ॲप काही महिन्यांपूर्वी सुधारणा करुन नवीन आवृत्ती (व्हर्जन) मध्ये सुरू केले आहे .त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बस स्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात, प्रवासाची माहिती तपासू शकतात.

सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – सविस्तर बातमी

१ एप्रिल २०२५ पासून सुरू केलेल्या नवीन MSRTC BUS RESERVATION ॲप ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून मार्च-२०२५ मध्ये ३ लाख ९४ हजार प्रवाशी जुन्या मोबाईल ॲपचा वापर करीत होते. सुधारित ॲप आल्यानंतर मे-२०२५ मध्ये सुमारे ६ लाख ७२ हजार प्रवाशांनी नवीन मोबाईल ॲपचा वापर केला आहे. सध्या १० लाख वापरकर्त्यापैकी सरासरी दरमहा ५ लाख प्रवासी सुधारित मोबाईल ॲपवरून तिकीट काढत आहेत.

तब्बल १ लाख २५ हजार प्रतिक्रिया

ॲप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांनी आपला अनुभव, ॲप बद्दलच्या सुचना, तक्रारी या बाबतीत भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अर्थात , वापरकर्त्यांच्या तक्रारी व सूचना या संदर्भात काही आव्हानं आहेत. नेटवर्क कव्हरेज कमी असलेल्या ग्रामीण भागात रिअल-टाइम माहिती व डिजिटल पेमेंटची सेवा सतत उपलब्ध नसल्याचे तक्रारीत दिसून येतात. तसेच, ज्येष्ठ नागरिक किंवा तांत्रिकदृष्ट्या पारखी नसलेल्या प्रवाशांसाठी ॲपचा वापर अवघड असल्याचेही काही प्रतिक्रिया आहेत.

“ग्रामीण भागांतील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने स्थानिक सुविधांचा विचार करून ॲपचे UI/UX अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. एस.टी.च्या मोबाईल ॲपला प्ले स्टोअर ॲप मध्ये ४.६ स्टार चे रेटिंग मिळाले आहे. अर्थात, या ॲप ला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद हा आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एक महत्त्वाच्या टप्प्याचे संकेत देतो. तंत्रज्ञानाचा वापर योग्य नियोजन व स्थानिक अडचणींचा विचार करून केला तर प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित व पर्यावरणपूरक सेवा मिळण्याची शक्यता वाढते. हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×