खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – नवरात्रोत्सवात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नगर रस्त्यावरील खराडी, तसेच वडगाव शेरी भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलांकडील तीन लाख १७ हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली.
फ्लॅटचे कुलूप तोडून दागिने लांबविले – सविस्तर बातमी
महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण खराडीतील अनुसया पार्क भागातून सोमवारी (२९ सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास निघाल्या होत्या. त्यावेळी आरपीएस सोसायटीसमोर दुचाकीस्वार चोरटयांनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील एक लाख सात हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.
वडगाव शेरी मंगळवारी (३० सप्टेंबर) दुपारी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील दोन लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत. नवरात्रोत्सवात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. बालेवाडी, हडपसर, तसेच खराडी भागात दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत.
स्वारगेट भागात प्रवासी महिलांचे दागिने लंपास
पुणे – शहरातील स्वारगेट परिसरात प्रवासी महिलांकडील दोन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना स्वारगेट स्थानक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महर्षीनगर भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात थांबल्या होत्या. धायरीकडे जाणाऱ्या पीएमपी बसची वाट पाहत त्या थांबल्या होत्या. बसमध्ये त्या प्रवेश करत होत्या. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी कटरचा वापर करुन महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची बांगडी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक केतकार तपास करत आहेत.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला चिंचवडच्या आहेत. त्या स्वारगेट ते पंढरपूर या मार्गावरील बसमध्ये सोमवारी सकाळी प्रवेश करत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी गर्दीत महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. प्रवासात दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिला हडपसर भागात बसमधून उतरल्या. त्यांनी हडपसरमधील फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस कर्मचारी प्रवीण पाेटे तपास करत आहेत.






















