Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

बाप-लेकाच्या मृत्यूला खोलीमालक जबाबदार…

खोलीमालकाच्या निष्काळजीपणामुळे बाप-लेकाचा मृत्यू, गुन्हा दाखल, वारजे माळवाडीतील गॅसस्फोट प्रकरण

Marathinews24.com

 पुणे – पत्र्याच्या खोलीला शॉर्टसर्किट झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत बाप-लेकाचा  मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास वारजे भागातील गोकुळनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी कोणत्याही प्रकारणची सुरक्षितता खोली मालकाने घेतली नाही. संपुर्ण पत्र्याच्या खोलीत करंट उतरल्यामुळे बाप-लेकाला घराबाहेर येता आले नाही. त्यानंतर गॅसचा स्फोट होउन दोघांचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित खोली मालकाविरूद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘एव्हीएटर’ गेम मध्ये इंजिनियरने गमावले तब्बल ३९ लाख रुपये – सविस्तर बातमी
नितीन नारायण बराटे वय ४२, रा. हर्षवर्धन इमारत, वारजे गावठाण असे गुन्हा दाखल झालेल्या खोली मालकाचे नाव आहे.  मोहन माणिक मुडावत (वय ४३), पप्पु मोहन मुडावत  (वय २३ दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडीतील गोकुळनगर भागात पत्र्याच्या खोलीत मोहन आणि पप्पू राहायला होते. ९ एपिलला मध्यरात्री सिलिंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. स्फोटात गंभीररित्या जखमी झाल्यामुळे मुडावत बाप-लेकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शॉर्टसर्किट झाल्यानंतर घरात आग लागली. त्यावेळी मोहन आणि पप्पू गाढ झोपेत होते. आग लागल्यानंतर दोघेही  झोपेतून जागे झाले. त्यानंतर ते घरातील मोरीत लपले होते. मात्र, त्याचवेळी खोलीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला आग लागून स्फोट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
खोलीत नव्हेत व्हेंटीलेशन, विद्युत प्रवाह संपुर्ण खोलीला
मुडावत राहत असलेल्या खोलीला व्हेंटीलेशन नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच एकच दरवाजा असल्यामुळे शॉर्टसर्किट संपुर्ण पत्र्याच्या खोलीला झाले. पत्र्यालाच करंट असल्याुमळे मुडावत बाप-लेकाला दरवाजा उघडता आला नाही. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होउन दोघांचा मृत्यू झाला. बाप-लेकाच्या मृत्यूला खोली मालक जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×