भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात वाहतूक बदल

वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन

Marathinews24.com

पुणे – भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लष्कर भागातील अरोरा टाॅवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. संबंधित भागातील वाहतूक व्यवस्थेत पर्यायी मार्गाने वळविली जाणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पर्यायी वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेेंडे यांनी केले आहे.

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहाँगीर रुग्णालयमार्गे इच्छितस्थळी जावे. आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहाँगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येमार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरु मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

पुणे स्टेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेस मार्गे इच्छितस्थळी जावे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.
लष्कर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात मोठ्या संख्येने जयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.

ससून रुग्णालयात जाणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश

ससून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिका, वाहनांसाठी शवागाराजवळील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटो झिंको प्रेस उपरस्ता सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहने लावण्यासाठी व्यवस्था

अनुयायांनी त्यांची वाहने एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओ चौकाजवळ), पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून काॅलनी येथे लावावीत.

दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल

दांडेकर पूल परिसरातील वाहतूक बदल करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सारसबाग, कल्पना हाॅटेल, ना. सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, जुना दत्तवाडी रस्ता, आशा हाॅटेल चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आशा हाॅटेल चौकमार्गे दत्तवाडीत यावे. तेथून इच्छितस्थळी जावे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरभरात वाहतुकीत बदल केला आहे त्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. रस्त्यालगत पार्किंग करू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

मनोरंजन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top