Breking News
खडकी पोलिसांची तत्परता आली कामी, अवघ्या ४ तासांत रिक्षा चालकाला शोधलेमराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही; सुप्रिया सुळेऑस्ट्रेलियासह पुण्यातही मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना…क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादनपुरस्कार विजेत्यांनी खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनपिंपरी-चिंचवड; दारूच्या नशेत बरळला अन खुनाची उकल झाली !सावकरासोबत पत्नीचे झेंगाट जुळले…मांजरी बुद्रूक परिसरात घरफोडी, ५ लाखांचा ऐवज लंपासशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष, दोघांची ६२ लाखांची फसवणूक

आयएमए पुण्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुधीर इंगळे, वैद्यकीय क्षेत्रात नव्या कामगिरीची तयारी

आयएमए संघटनेचे काम जोमाने पुढे नेणार-डॉ. सुधीर इंगळे, इंडियन मेडीकल असोशिएशन पुणे अध्यक्षपदी विराजमान

Marathinews24.com

पुणे – इंडियन मेडीकल असोशिएशनचे काम जोमाने पुढे नेण्यासाठी प्राधान्य देणार असून, संघटनेचा अध्यक्ष म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणार आहे. आजपर्यंत समाजासह शासनाला मदत करण्यासाठी आपल्या संघटनेने सातत्याने प्राधान्य दिले आहे. नैसर्गिक आपत्तीसह विविध संकटात संघटनेने सामाजिक बांधिलकीची मोठी जबाबदारी पार पाडली आहे. संघटनेच्यावतीने सुरू असलेले सर्टिफिकेट कोर्स सुरूच ठेवणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष डॉ सुनील इंगळे यांनी दिली आहे.

गोखलेनगरात महिलेला लुटले; भरदिवसा मंगळसूत्र चोरीची घटना – सविस्तर बातमी

इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे यांच्यावतीने टिळक रोडवरील डॉ नीतू मांडके सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी डॉ मावळते अध्यक्ष डॉ. राजन संचेती यांनी डॉ. सुनील इंगळे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा पदभार दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ दिलीप भानुशाली, डॉ संतोष कदम, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, डॉ रणजित घाडगे, डॉ अंजली साबणे, डॉ रवींद्र छाजेड, डॉ अर्चना सिंघवी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुनील इंगळे म्हणाले, आयएमए (इंडियन मेडीकल असोशिएशन) संघटेनेला पुढे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आपण जबाबदारी पार पाडणार आहोत. यासाठी आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले असून, आता प्रत्येक विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे घडलेल्या घटनांची माहिती मिळताच काही वेळेतच बिट मार्शल आपल्या मदतीला येत आहेत. त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. दरम्यान, लघुउद्योगांना ज्याप्रमाणे चालना मिळते, त्याचपद्धतीने छोट्या रुग्णालयाना चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मावळते अध्यक्ष डॉ. राजन संचेती म्हणाले, रुग्णांना मरणाच्या दारातून बाहेर काढणारे डॉक्टर असून, त्यांच्या व्यावसायबाबत कोणीही अविश्वास दाखवू शकत नाही. आम्ही सर्वोत्तम सेवा बजावण्यात नेहमी अग्रेसर असतो. मात्र, काही लोकांकडून आपल्याला जाणीवपूर्वक नावे ठेवली जात आहेत. हे बदलण्यासाठी आणि लोकांमधील आपली प्रतिमा उजळून टाकण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, आपण जे बोलते त्याचे चिंतन समाज करत नाही. त्यामुळे आता बोलण्याचीही अडचण होत आहे. डॉक्टर आणि पोलिस यांचे नातं समतोल असून, दोघांचे काम पुढे येऊन करावेच लागते. आपल्याकडे येणारे लोक खूप तातडीच्या स्वरूपात येतात. डॉक्टर पोलीस आणि समाज हा त्रिकोणी असून, त्याचा आपण समतोल साधला पाहिजे. आपण सत्याचा शोध घेत असतो. हा कार्यकारण भाव आपण तपासतो, या समाजाला चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. अनेक डॉक्टरांनी आपला पेशा सांभाळून काम केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top