Breking News
कोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळती

सिंहगड रस्ता परिसरात सराइताचा खून

धायरीत तरुणाच्या डोक्यात बॅट मारून खून

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सराईतावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी सिंहगड रस्ता परिसरात घडली. खून झालेला तरुण कोंढव्यात राहायला होता. त्याचा खून वैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध रात्री उशिरा सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.

रेल्वेच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

तौकीर रफीक शेख (वय २३, रा. मक्का मशिदीजवळ, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तौकीरविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तौकीर आणि त्याचा मित्र सोमवारी दुपारी वडगाव बुद्रुक परिसरात आले होते. इमारतीच्या पार्किंगमध्ये ते गप्पा मारत होते. त्यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. तौकीरच्या डोक्यात कुंडी घातली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तौकीरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. घटनास्थळी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तौकीर याचा खून वैमनस्यातून झाल्यााची शक्यता आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. सीसीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित आढळून आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक दाईंगडे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×