Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

सुश्राव्य गायन मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

डॉ. रेवती कामत यांच्या सुरेल रचनांनी रसिक तृप्त

marathinews24.com

पुणे – सुश्राव्य, सुमधुर गायन त्याला संयमित तबला वादनासह मोहक संवादिनीच्या सुरावटींची लाभलेली साथ अशा सांगीतिक मैफलीचा आनंद आज रसिकांना मिळाला. निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित डॉ. रेवती कामत यांच्या शास्त्रीय गायन मैफलीचे.

पुण्याने देशाला कसलेले खेळाडू दिले – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ – सविस्तर बातमी

स्वरमयी गुरुकुल, संभाजी उद्यानासमोर येथे रविवारी (दि. २३) या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रेवती कामत यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग ललतमधील गुरू डॉ. अश्र्विनी भिडे-देशपांडे रचित ‘हो नंदलाल’ या विलंबित एक तालातील रचनेने केली. यानंतर डॉ. प्रभा अत्रे यांचे सांगीतिक विचार मांडत डॉ. रेवती कामत यांनी डॉ. प्रभा अत्रे यांची ‘नम जपत बार बार, हे गोपाल हे दयाल’ ही भक्तिभावपूर्ण बंदिश सुमधुरपणे सादर केली.
डॉ. कामत यांनी जौनपुरी राग सादर करताना दोन बंदिशी ऐकविल्या. यात झपतालातील ‘मानो जरा नित दिन’ तसेच ‘पायल बाजन लागी रे अब’ यांचा समावेश होता. ‘अब मोरी बात मान ले पिहरवा’ ही राग शुद्ध सारंगमधील बंदिश प्रभावीपणे सादर करून त्यांनी रसिकांना आनंदित केले.

मैफलीची सांगता भैरवीने करताना डॉ. रेवती कामत यांनी सुप्रसिद्ध ऐतिहासिक कवी, संगीतकार अमीर खुसरो यांनी रचलेल्या जीवनाचे वास्तव दर्शविणाऱ्या ‘बहुत रही बाबुल घर’ या रचनेतील अर्थपूर्णता प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविली.

डॉ. रेवती कामत यांना भरत कामत (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), ओजस्वी वर्टीकर (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत स्वरमयी गुरुकुलचे सल्लागार भरत वेदपाठक यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी घोडके यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×