पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात लागली आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आग

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असलेल्या खडक पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षात रविवारी आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत खुर्च्या आणि आसनव्यवस्था जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

राज्यभरातील सराइतांना ७०० ते ८०० पिस्तुलांची विक्री – सविस्तर बातमी

खडक पोलीस ठाणे शहराच्या मध्यमागात आहे. ब्रिटीशकालीन मामलेदार कचेरीच्या आवारात खडक पोलीस ठाणे असून, पोलीस ठाण्याच्या वास्तुचा १० वर्षापूर्वी पुनर्विकास करण्यात आला.

पोलीस ठाण्याच्या आवारात स्वागत कक्ष आहे. रविवारी रात्री स्वागत कक्षातून धूर येऊ लागला. स्वागत कक्षात आग लागली. या घटनेची माहिती पोलिसांनी त्वरीत मुख्य अग्निशमन केंद्राला दिली. त्यानंतर पाच मिनिटात लोहियानगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

आगीत स्वागत कक्षतील खुर्च्या आणि आसन व्यवस्था जळाली. आगीत स्वागतकक्षातील कागदपत्रे जळाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×