दहशत माजवणार्‍या सराईताला केले स्थानबद्ध

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना

चतुःशृंगी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील चतुःशृगी परिसरात दहशत माजवून दादागिरी करणार्‍या सराईताविरूद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीनुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. औदुंबर उर्फ मोन्या रवींद्र नाकते (वय २९, रा. जनवाडी, गोखलेनगर) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध मागील पाच वर्षात सहा गुन्हे दाखल आहेत.

घरी जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने थेट चोरला टेम्पो – सविस्तर बातमी

सराईत औदुंबर उर्फ मोन्या गोखलेनगरमध्ये राहायला असून, त्याच्याविरूद्ध विविध स्वरूपाचे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्याविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्तावर चतुःशृंगी पोलिसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठविला होता. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे, एपीआय सचिन कारंडे, एपीआय अनिकेत पोटे, जाधव, पालांडे, ठोसर, बडे, वाघवले, मोमीन, दांगडे, शिर्के, गिरंगे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×