महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे 25 व 26 नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर 

संविधान-५ निधी, महसूलातील आरक्षित निधी, सामाजिक न्याय योजना व विविध विभागांच्या कामकाजाचा दोन दिवस आढावा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य (संसदीय दर्जा) गोरक्ष लोखंडे हे दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.

शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन व २०७० पर्यंत ‘नेट-झिरो’साठी पुढाकार – सविस्तर बातमी

दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील सभागृह हॉलमध्ये जिल्हाधिकारी यांचे समवेत संविधान -5 निधीबाबत आढावा बैठक. दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह पुणे येथे नियोजित प्रकरणांच्या सुनावण्या. दुपारी 2.30 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 3. वा. जिल्हा परिषद येथील हॉलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे यांच्या समवेत जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5वर्षाचा आढावा व कामाची तपासणी, अनुसूचित जातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह, पुणे येथे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांच्या समवेत आढावा बैठक. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक. दुपारी 5 वा. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या समवेत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेबाबत आढावा बैठक. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृ, पुणे येथे महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या समवेत आढवा बैठक व मुक्काम.

दि. 26 नोव्हेंब रोजी सकाळी 11 वा. त्रिरत्न लॉन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी, दापोडी येथे टीबीएमएसजी (TBMSG) या संस्थेने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती व मार्गदर्शन करतील.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×