Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज सुरळीत

व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

marathinews24.com

पुणे – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) वितरण तात्पुरते स्थगित असले तरी, इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू असून लाभार्थ्यांना देण्यात येणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात आहे. सप्टेंबर 2025 अखेर होल्ड किंवा ब्लॉक केलेल्या प्रकरणांव्यतिरिक्त सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन – सविस्तर बातमी

काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज थांबले असल्याच्या प्रसारित बातम्यांवर स्पष्टीकरण देताना महामंडळाने स्पष्ट केले की, नवीन पात्रता प्रमाणपत्र प्रक्रीयेतील काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र, व्याज परतावा आणि बँक मंजुरीसंबंधित प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे.

अशा गैरव्यवहारांना आळा बसावा म्हणून महामंडळाने खाते प्रमाणिकरण( Account Validation) प्रणाली लागू करण्यास सुरुवात केली आहे. एजंटमार्फत दाखल झालेली संशयित प्रकरणे तात्पुरती ब्लॉक करण्यात आली आहेत. अशा लाभार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचे संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता, एकाच मोबाईल क्रमांक किंवा लॉगिनद्वारे केवळ एकच अर्ज दाखल करता येईल.

पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रियेमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा पूर्ण केल्यानंतर शक्य तितक्या लवकर नवीन पात्रता प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×