Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाची उत्कृष्ट कामगिरी

विभागीय स्तरावर क्रीडा निपुणता केंद्रात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

३१ सुवर्णांसह महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; प्रशिक्षणार्थींच्या २७ पदकांनी वाढवला यशाचा मान

marathinews24.com

पुणे –  डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित २८ व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलन २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत ३१ सुवर्ण, २६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ७७ पदके जिंकत २८६ गुणांसह देशात चौथे स्थान पटकावले. तसेच राज्यातील १३ क्रीडापटूंनी चौथे स्थान मिळवत भक्कम कामगिरीची नोंद केली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज सुरळीत – सविस्तर बातमी

रायपूरमध्ये पार पडलेल्या २७ व्या AIFSM 2024 मधील ८ व्या स्थानावरून महाराष्ट्राने यंदा थेट ४ थ्या स्थानावर झेप घेतली आहे.

या यशात राज्यातील ४ वन प्रशिक्षण संस्था आणि २ वन अकादमींतील प्रशिक्षणार्थींचा मोलाचा वाटा असून त्यांनी एकूण २७ पदके मिळवली. विविध ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये—धावणे, लांब पल्ला, रिले, मॅरेथॉन, लांब उडी, रेस वॉक, आलाफेक, भारोत्तोलन आणि पॉवरलिफ्टिंग—यामध्ये प्रशिक्षणार्थींनी ९ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली.

एकूणच, महाराष्ट्र वन विभागाच्या प्रशिक्षणार्थींच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र वन विभाग शिक्षण आणि प्रशिक्षण शाखेतर्फे सर्व विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक व प्रशिक्षण संस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×