Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

नवले पुलावर वेग मर्यादेचे उल्लंघन

नवले पुलावर वेग मर्यादेचे उल्लंघन

बेशिस्त ११० वाहन चालक कारवाईच्या जाळ्यात; प्रत्येकी २ हजारांचा दंड

marathinews24.com

पुणे – शहरालगत कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिजदरम्यान अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने २५ नोव्हेंबरपासून वेगमर्यादा लागू केली आहे. संबंधित मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ३० किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा बंधनकारक केली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी तब्बल ११० बेशिस्त वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे.

पेट्रोल पंपावरील कामगाराची फसवणूक – सविस्तर बातमी 

नवले ब्रिज परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे वाहतूक चालकांसह नागरिकामध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने परिसरातील वेग मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे मंगळवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. ३० किलोमीटर प्रती तास अशा वेगाने वाहन चालवणे बंधनकारक असतानाही अनेक वाहन चालकांनी बेफाम वाहने दामटली आहेत. वेग मर्यादाचे उल्लंघन करीत ११० वाहन चालकांनी नियम भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

नागरिकांसह वाहन चालकांच्यादृष्टीने वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासह किरकोळ अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी वेग मर्यादेचा आदेश जारी करण्यात आला आहे. मंगळवारपासून ( दि. २५) वाहन चालकांनी स्पीडोमीटरकडे लक्ष देत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. वेगमर्यादा मोडणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या सहाय्याने कारवाई केली जात आहे. बोगदा परिसर आणि नवले ब्रिजकडे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

शहरातील वाहतूक नियमन करण्यासह नवले पुल परिसरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वेग मर्यादा निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने मंगळवार पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ११० बेशिस्त वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्याविरुद्ध ऑनलाइनरित्या प्रत्येकी २ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. – हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×