Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पेट्रोल पंपावरील कामगाराची फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मंगळवार पेठेतील एका पंपावर पेट्रोल भरल्यानंतर ऑनलाइन पैसे जमा केल्याची बतावणी करून चोरटे पसार झाले. याप्रकरणी मोटारचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंपावरील कामगार समीर याकुब काझी (वय ३५) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालकासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

महाविद्यालयीन युवकाला लुटण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेत पंचरत्न पेट्रोल पंप आहे. २३ नोेव्हेंबर रोजी मध्यरात्री मोटारीतून दोघे जण पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले होते. मोटारचालकाने काझी यांना पेट्रोल भरण्यास सांगितले. मोटारीच्या टाकीत दोन हजार ४३३ रुपयांचे पेट्रोल काझी यांनी भरले. त्यानंतर पेट्रोलचे पैसे ऑनलाइन पद्धतीने जमा करतो, असे सांगितले. ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविल्याचे काझी यांना सांगितले. काझी यांनी ऑनलाइन व्यवहाराची पडताळणी केली, मात्र पैसे जमा झाले नव्हते. दरम्यान, मोटारचालक आणि साथीदार पंपावरून पसार झाले. पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या मोटारचालकासह साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रणील चौगुले तपास करत आहेत.

प्रवाशाकडील १ लाखाची रोकड लंपास

पीएमपी प्रवाशाच्या पिशवीतून चोरट्यांनी एक लाखाची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका प्रवाशाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे कर्नाटकातील आहेत. ते सोमवारी (२४ नोव्हेंबर) कामानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास डांगे चौक ते पुणे स्टेशन या मार्गावरील बसमधून ते प्रवास करत होते. प्रवासादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून एक लाखाची रोकड चोरून नेली. पुणे स्टेशन परिसरात ते बसमधून उतरले तेव्हा पिशवीतून रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक चौगुले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×