भरधाव टेम्पोच्या धडकेत तरूण पादचारी ठार

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

टेम्पो चालकाविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत तरूण ठार झाल्याची घटना २९ नोव्हेंबरला रात्री पावणेएकच्या सुमारास घडली आहे. हा अपघात कात्रज घाटातून स्वारगेटकडे येत असताना झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सरोदे (वय ३५, रा. भिलारवाडी, कात्रज) असे ठार झालेल्याचे नाव आहे. रेश्मा पवळ (वय ३२ रा. कात्रज ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मेट्रोमनीवरील ओळख पडली महागात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सरोदे हा २९ नोव्हेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास त्रिमुर्ती हॉटेलच्या समोरील रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगातील टेम्पो चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या अक्षयला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीराज थोरात तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×