Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची ४७ लाखांची फसवणूक

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूक

समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात अटक करण्यात येणार आहे’, अशी भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्याने कारवाईची भीती दाखवून सोमवार पेठेत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मेट्रोमनीवरील ओळख पडली महागात – सविस्तर बातमी 

सायबर चोरट्याने २८ ऑक्टोबरला ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आल्याची भीती दाखवून चोरट्यांनी तातडीने खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर महिनाभरात ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.

महिलेसह दोघांची फसवणूक

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची २१ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केली. महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शुक्रवार पेठेत राहायला आहेत. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता.

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी महिलेची फसवणूक केली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सिंहगड रस्ता भागातील एका ज्येष्ठाची सायबर चोरट्यांनी नऊ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×