Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

वडकी परिसरात घरफोडी, २ लाखांचा ऐवज चोरीला

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी २ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २८ नोव्हेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास वडकीतील १० वा मैल परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यपान केल्यानंतर मित्राचीच चोरली चैन; आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडकीतील १० वा मैल परिसरात राहायला आहे. २८ नोव्हेंबरला चोरट्यांनी भरदुपारच्या सुमारास त्यांच्या घराची कडी उघडली. आतमध्ये प्रवेश करून ६५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेला. घरी आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करीत आहेत.

वारजेत ७४ हजारांचे दागिने चोरीला

फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ७४ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २८ नोव्हेंबरला वारजेतील अविष्कार अपार्टमेंटमधील सपना सहकारी गृहनिर्माण संस्था याठिकाणी घडली आहे. ५३ वर्षीय नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिया्रद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे वारजेतील सपना सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील अविष्कार अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत.२८ नोव्हेंबरला त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तक्रारदाराच्या बेडरूमधील कपाटातून ७४ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×