चितळे बाकरवडीची डमी विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे – शहरातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांच्या प्रसिद्ध असलेल्या बाकरवडीची कॉपी करून चितळे स्वीट होम नावाने बनावट बाकरवडी बाजारात विक्री केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . त्यानुसार अज्ञात आरोपीं विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318 (2 ),350 ,66(सी),66 (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
साडूला धडा शिकवण्यासाठी त्याने थेट दारुगोळा कारखान्यात चोरी केली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडीच्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी मागील काही दिवसापासून येत होत्या. तक्रारींची दखल घेत चितळे बंधू मिठाईवाले यांनी पाहणी केली असता, कोणीतरी चितळे स्वीट होम नावाने बाकरवडीची पाकिटे विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. चितळे स्वीट होमचे नाव त्या पाकिटांवर वापरून चितळे बंधू मिठाईवाले यांचाच कस्टमर केअर नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स ,ई-मेल आयडी, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स ,वेबसाईटची माहिती पाकिटावर नोंदवली असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे ग्राहकांना पाकिटे चितळी स्वीट होमचीच असल्याचे भासविले. पाकिटांची योग्य प्रकारे तपासणी केली असता, त्याच्या बाकरवडी बनवण्याच्या पत्त्यात फरक होता .चितळे बंधू मिठाईवाले यांचे भोर तालुक्यात राजे याठिकाणी बाकरवडी तयार करण्याचा मुख्य कारखाना असून पुण्यातील पर्वती इंडस्ट्रियल कॉलनी मुकुंदनगररात बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट्स आहेत .मात्र ,बनावट बाकरवडीच्या पाकिटावर वेगळाच पत्ता दिसून आला आहे. विश्रामबाग पोलीस तपास करत आहे.