घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधली
Marathinews24.com
पुणे – नवरात्र उत्सवासाठी घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून दाजीने विवाहित मेव्हणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. डोके दुखत असलेल्या मेव्हुणीला गुंगीच्या गोळ्या खाण्यास देऊन तिच्यावर जबदरदस्तीन बलात्कार केला आहे. याप्रकरणी १८ वर्षाच्या तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून ३६ वर्षीय दाजीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात वाहनांची तोडफोड तब्बल १७ वाहने फोडणाऱ्या टोळीला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीतेच्या घरातील लोक दि. ३ ते १२ ऑक्टोबर २०२४ कालावधीत नवरात्रीनिमित्त यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी तिचा दाजी घरी होता. तरूणीचे तिचे डोके दुखत असल्याचे दाजीला सांगितले होते. त्यावेळी दाजीने घरात कोणीही नसल्याची संधी साधून मेव्हणीला दोन गोळ्या खायला दिल्यामुळे तिला गुंगी आली. त्याच दिवशी संधीचा फायदा घेऊन आरोपीने मेव्हणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. तु आपल्यामध्ये झालेल्या शारीरीक संबधाबद्दल कोणाला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. शाररीक संबधाचे चित्रीकरण तरूणीच्या सासरी व पतीला दाखवून तिच्या पतीला शिवीगाळ करत भांडणे केली.
तरूणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी
तरूणीचा पाठलाग करून तिला लग्नासाठी तरूणाने दबाव टाकला. माझ्याशी लग्न केले नाही, तर तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देणार्या तरूणावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १९ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मे २०२४ ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. आरोपीने तरूणीला लग्न न केल्यास तिचे फोटो इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तुझ्या घरी येवून विष पिऊन जीव देईल, नाहीतर करंट लावून घेतो असेही त्याने धमकाविल्याचे तरूणीने तक्रारीत नमूद केले आहे.