पुण्यातील चंदननगरमधील घटनेने खळबळ
Marathinews24.com
पुणे – बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरुन गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या वादात गाडीचालकाने कट मारल्याची भर पडली. त्यातून तिघांनी मिळून तरुणाच्या डोक्यात फरशीचा तुकड्याने वार करुन त्याचा खून केला. प्रदीप बाबासा हेब अडागळे (वय २२, रा. आभाळवाडी, वाघोली) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी ऋषी काकडे व त्याची आई सुनिता काकडे (रा. थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ घडली.
पोलीस उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यासाठी १३ जणांचे पथक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडेचा भाजीचा व्यवसाय असून, प्रदीप अडागळे याने ऋषी काकडे याच्या बहिणीची छेड काढल्यावरुन त्यांच्यात एक वर्षांपासून वाद होत होते. त्यातच गुरुवारी (दि. १७) गाडीने कट मारल्यावरुन अल्पवयीन मुलाबरोबर प्रदीप अडागळे याचा वाद झाला होता. त्याच वादातून टोळक्याने प्रदीपला चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ बोलविले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून तिघांनी मिळून प्रदीपच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत प्रदीपला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. प्रदीववर उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यु झाला. त्यानुसार आता संबंधित गुन्ह्यात पोलिसांनी खुनाचे कलम वाढवले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.