भीमथडी’ जत्रेतील स्टाॅलमधून ५५ हजारांची रोकड लंपास

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ‘भीमथडी’ जत्रेतील स्टाॅलमधून ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हडपसरमध्ये कालव्यात ढकलून तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या इंदापूरमधील बेलवडी थोरातवाडी गावातील रहिवासी आहे. महिला आणि गावातील बचत गटातील महिलांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘भीमथडी’ जत्रेत खाद्यपदार्थांचा स्टाॅल लावला आहे. गुरुवारी (२५ डिसेंबर) नाताळची सुट्टी असल्याने ‘भीमथडी’ जत्रेत गर्दी झाली होती. खाद्यपदार्थ विक्रीतून जमा झालेली रोकड महिलेने स्टाॅलमधील स्टिलच्या डब्यात ठेवली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चोरट्यांनी स्टिलच्या डब्यात ठेवलेली ५५ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

खासगी कंपनीतून १५ लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य चोरी

हडपसर भागातील एका खासगी कंपनीतून १५ लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य चोरट्यांनी लांबविले. एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी परिसरात खासगी कंपनी आहे. चोरटे मध्यरात्री कंपनीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी कंपनीच्या आवारात ठेवलेले ॲल्युमिनियम साहित्य चोरून नेल्याचे नुकतेच उघडकीस आले. पोलीस कर्मचारी मुंढे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×