जीएसटी घोटाळ्यात बीडच्या दोघांना बेड्या

नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – बनावट जीएसटी बील तयार करुन शासनाचा महसूल बुडवल्याच्या बीडमध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बीडमधील उमेर व शकील नामक दोघांना अटक केली असून आणखी काहीजण नागपूर पोलिसांच्या रडावर आहेत. दरम्यान, नागपूर पोलिसांनी बीडमधील दोघांना अटक केल्याने नागपूरमधील जीएसटी घोटाळ्यात बीडचे कनेक्शन समोर आले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर लैंगिक अत्याचार – सविस्तर बातमी

बोगस जीएसटी बिलाच्या प्रकरणात नागपूरमध्ये दाखल झालेला एका गुन्ह्याच्या अनुषंगाने बीडचे नाव समोर आल्याने पोलिसांनी बीडमध्ये येऊन झाडाझडती घेतली. नागपूर मधील बोगस जीएसटी बिल घोटाळ्याचे धागेदोरे बीडपर्यंत आल्याने तेथील पोलिसांच्या दोन टीम काल बीड पोलीस ठाण्यात आल्या होत्या. लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पेठ बीड पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन जणांना अटक केली आहे.

जीएसटी प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे देखील पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असल्यानेच पोलिसांनी बीडमधील कारवाईच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर गोपनीयता पाळल्याचे दिसून आले आहे.दरम्यान, बीडमध्ये यापूर्वीही बोगस जीएसटी बिलाच्या प्रकरणात पोलीस कारवाई झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नागपूरमध्ये दाखल झालेल्या बोगस जीएसटी बिलाच्या घोटाळ्याशी बीडचे नाव आल्यामुळे आल्याने खळबळ उडाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×