Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

चेक बाउन्स प्रकरणी महिलेला १० लाखांच्या दंडासह ६ महिने कारावास

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आठवे यांनी दिला महत्त्वपूर्ण निकाल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – चेक (धनादेश) बाउन्स झाल्याप्रकारणी महिलेला शिक्षा सुनावली आहे. हातउसने घेतलेले पैसे परत न केल्यामुळे आरोपी महिलेला १० लाख रुपये दंड आणि ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हा निकाल दिला आहे. बीड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आठवे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

हडपसरमधील सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा – सविस्तर बातमी

फिर्यादी सुनील मुरलीधर जगताप आणि आरोपी पंचफुला मधुकर जगताप यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. १२ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपी पंचफुला जगताप यांनी फिर्यादीकडून १० लाख रुपये हातउसने घेतले होते. ही रक्कम परत करण्यासाठी आरोपीने सुनील जगताप यांना युनियन बँक ऑफ इंडियाचा १० लाख रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वटला जाईल आणि तुमचे पैसे मिळतील, असा विश्वासही आरोपीने दिला होता. जगताप यांनी धनादेश बँकेत जमा केला असता, आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक नाही या कारणास्तव तो बाउन्स झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील जगताप यांनी बीड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ‘सुनील विरुद्ध पंचफुला’ समरी क्रिमिनल केस क्र. १८४३/२३) अन्वये दाद मागितली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि पुराव्यांची शहानिशा केली. न्यायालयाने हा निष्कर्ष काढला की आरोपीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट क्टच्या कलम १३८ नुसार गुन्हा केला आहे. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत न्यायालयाने आरोपी पंचफुला जगताप यांना १० लाख रुपये आणि ६ महिने कारावासाची शिक्षा दिली. फिर्यादी सुनील जगताप यांच्यावतीने वकील शशिकांत सावंत यांनी बाजू मांडली. त्यांना या प्रकरणात वकील विशाल विलासराव कदम, वकील अभिषेक बहिर, वकील माऊली डाके, वकील राजकुमार धरणे, वकील मुकुंद लोणकर, वकील प्रदीप दराडे, वकील विजय डोके, वकील अमोल तिडके आणि वकील प्रतीक गव्हाणे यांनी सहकार्य केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×