Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी डोंगरे कुटुंबियांचे केले सांत्वन

मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखाचा निधी

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डोंगरे कुटुंबीयांचे दुःख सावरण्याठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे माजलगावचे भूमिपुत्र तथा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी डोंगरेवाडीत येऊन डोंगरे कुटुंबीयांची भेट घेतली.

पत्नी फेसबुक लाईव्ह करत असताना पतीचा जीव गेला – सविस्तर बातमी

कुटुंबियांचे दुःख जाणून घेऊन त्यांना धीर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये मदत करणार असल्याचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला. घटनेबाबत डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवर मेसेजद्वारे माहिती दिली. प्रचाराच्या व प्रवासात असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे डॉ. शेटे यांच्यामार्फत डोंगरे कुटुंबीयांना कळवले आहे. याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. याशिवाय डोंगरे कुटुंबाला घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्याची सुचना सरपंचांना दिली आहे. तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेतूनही आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार केशवराव आंधळे यांनी डोंगरे यांच्या तिन्ही मुलींच्या शिक्षणासाठी लागणारा आवश्यक खर्च करण्याचे जाहीर केले आहे. जिथे गरज असेल तिथे आपण डोंगरे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही ते म्हणाले. हाक द्या, मी कायम मदतीसाठी तत्पर आहे, असे सांगत डॉ. शेटे यांनी कुटुंबाला धीर देत सांत्वन केले. यावेळी माजी सभापती दिनकरराव आंधळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय आंधळे, तहसीलदार वैभव महिंद्रकर, बंडु खांडेकर, सरपंच भगवान कांदे, कल्याण शेप, श्रीमंत मुंडे, सरपंच मयुर आंधळे, रंजीत धस, उत्तरेश्वर खताळ, ऋषिकेश खोटे, राम सावंत, सागर म्हेत्रे, सुग्रीव मुंडे, कृष्णा खाडे, यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×