Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पत्नी फेसबुक लाईव्ह करत असताना पतीचा जीव गेला

पत्नी फेसबुक लाईव्ह करत असताना पतीचा जीव गेला

रिल्सस्टार गणेश डोंगरेच कुटुंब क्षणात झालं पोरकं

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – ऊसतोड कामगाराची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असताना पतीच्या अंगावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडून अपघात झाला. त्यामुळे ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंब प्रमुखाचा जागीच जीव गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश डोंगरे असे ठार झालेल्या रील्सस्टारचे नाव आहे.

चेक बाउन्स प्रकरणी महिलेला १० लाखांच्या दंडासह ६ महिने कारावास – सविस्तर बातमी 

गणेशची बायको फेसबुक लाईव्ह करत असताना तिच्या डोळयासमोर हा अपघात होऊन त्याचा प्राण गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. फेसबुक लाईव्हमध्ये ओरडली अन् तिचे डोळे पानवले. अश्रूचा बांध फुटला अन् तिने टाहो फोडला. बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोन्नाखोटा या ठिकाणचा रहिवासी असलेला गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी हे ऊसतोडणीसाठी गेले होते.
कष्टाच्या घामातून कुटुंबाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे वडवणी तालुक्यातील डोंगरयाची वाडी येथील डोंगरे कुटुंब चिमुकल्या तीन लहान लेकरांसह ऊस तोडणीसाठी गेलं होतं. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात गणेश डोंगरे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे वडवणी तालुक्यासह अख्खा जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त होत आहे.

वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील गणेश डोंगरे यांच्याकडे एक एकर जमीन आहे. वडवणी तालुक्यातील डोंगरयाची वाडी येथील डोंगरे कुटुंब आपल्या चिमुकल्या तीन लेकरांसह ऊस तोडणीसाठी गेलं होतं. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात गणेश डोंगरे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे वृद्ध आई-
वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या लेकरावर दुर्दैवी वेळ ओढवली आहे. या घटनेमुळे वडवणी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोकाकळा पसरली आहे.

आई वडील भोळसर असल्यामुळे गणेश यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. पत्नी अश्विनी अत्यंत गुणवान आणि कष्टाळू. दोघांना तीन मुली झाल्या. तीन मुलींचे पालन-पोषण, आई-वडिलांची जबाबदारी त्यामुळ वाढलेला खर्च गावाकडे राहून भागत नव्हता. गावाकडील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला नाजूक आर्थिक परिस्थितीशी झुंज द्यावी लागत होती. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी गणेश आणि अश्विनी यांनी मुंगळा ट्रॅक्टरद्वारे ऊस तोडणी सुरू केली.

लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर हे दाम्पत्य लेकरांसह ऊस तोडणी करत होते. शनिवारी दि.३ डिसेंबर दुपारच्या वेळेला ट्रॅक्टर भरून ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. त्याचवेळी एक ट्रॅक्टर जवळून जात असताना गणेशच्या अंगावर कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण जखमी झाला. अश्विनीच्या डोळ्यासमोर काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच ही घटना घडल्यामुळे अश्विनीवर दुःखाचे आभाळ कोसळले. गणेशच्या मृत्यूची खबर सोशल मीडियातून बीड जिल्ह्यात पोचली.

अश्विनी आणि गणेश डोंगरे हे दाम्पत्य रीलस्टार होतं. ऊस तोडणी करून जगताना मोठ्या आनंदाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आलेल्या परिस्थितीशी ते तोंड देत होते. गणेशचा अपघात झाला त्यावेळी अश्विनी सोशल मीडियावर लाईव्ह होती. लाईव्ह असतानाच ही ट्रॉली गणेशच्या अंगावर पडली. एक हसतं- खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यावर हा अपघात झाला तो केवळ साखर कारखान्याच्या चुकीमुळे झाला आहे. ज्या ठिकाणी वाहने उभे राहतात त्याठिकाणी व्यवस्थित रस्ता नाही. त्यामुळे हा अपघात कारखान्याच्या चुकीमुळे झाला आहे. विशेष म्हणजे कारखान्यावर वेळेवर माप होत नव्हते. माप न झाल्यामुळे गणेशला आपले वाहन मापाच्या प्रतीक्षेत उभे करून थांबावं लागलं होतं. त्यामुळे अपघाताची जबाबदारी स्वीकारून साखर कारखान्याने गणेशच्या तीन लेकरं, पत्नी आई-वडिलांसाठी किमान ३० लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी व त्यांच्या पालनपोषणाची, शिक्षणाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांकडून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×